चंद्रपूर : सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणीत होलपॅक डंपरला आग sakal
विदर्भ

चंद्रपूर : सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणीत होलपॅक डंपरला आग

नऊ महिन्यापुर्वी या कोळसा खाणीत डंपर उलटून पेट घेतल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील सास्ती ओपनकास्ट या खुल्या खाणीत कोळसा वाहतुक करणार्‍या एका डंपरला आग लागून त्याचा इंजिन व चालकाच्या केबिन कडील भाग जळून खाक झाला. एका कामगाराला आग लागल्याचे दिसताच त्याने तातडीने चालकाला माहिती देऊन शिताफीने होलपॅक - डंपर वरुन खाली उतरविले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या कोळसा खाणीत सध्या सतर्कता जागरूकता अभियान सुरू आहे. नऊ महिन्यापुर्वी या कोळसा खाणीत डंपर उलटून पेट घेतल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

आज दिनांक 7 नोव्हेंबरला सकाळच्या पाळीत दहा वाजताचे दरम्यान भारत कुडे हे चालक खाणीतून कोळसा भरून सतरा क्रमांकाच्या कोळसा स्टॉककडे बीएमएल कंपनीचा डंपर क्रमांक 1241 घेऊन जात होते. यावेळी अचानक ठिणगी पडून डंपरच्या इंजिनाजवळ आग लागली. मात्र 60 टनाचे मोठे डंपर असल्याने चालकाला काहीच लक्षात आले नाही.

परंतु यावेळी दुसऱ्या डंपरचे चालक व कामगार नेते मधुकर डांगे यांना लक्षात येताच त्यांनी तातडीने इतर कामगारांच्या मदतीने भारत कुडे यांना खाली उतरविले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचना दिली. यानंतर अग्नीशमन यंत्रणेने ही आग विझवली. यामुळे प्राणहानी आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले. सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीत नऊ महिन्यापूर्वी अपघात होऊन डंपर उलटून चालक अक्षय खरतड यांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी कामगारांच्या सतर्कने मोठी दुर्घटना टळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाड्यांचे इंजिन धोक्यात! पेट्रोलमध्ये मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉलची भेसळ; कर्नाटक सरकारचे तेल कंपन्यांवर गंभीर आरोप

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

SCROLL FOR NEXT