पीकविमा नोंदणीत चंद्रपूर आघाडीवर Sakal
विदर्भ

Crop Insurance : पूर्व विदर्भात पीकविमा नोंदणीत चंद्रपूर आघाडीवर; १० लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून एक रुपयांत पीकविम्याची योजना सुरू केली आहे. केवळ एक रुपयांत पीक संरक्षित होत असल्याने पीकविमा काढण्यासाठी खरीप हंगामापासून केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे.

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून एक रुपयांत पीकविम्याची योजना सुरू केली आहे. केवळ एक रुपयांत पीक संरक्षित होत असल्याने पीकविमा काढण्यासाठी खरीप हंगामापासून केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. पूर्व विदर्भात आतापर्यंत १० लाख ९८ हजार ७७७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ६०८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. पूर्व विदर्भात पीक नोंदणीत चंद्रपूर जिल्हा आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यात २ लाख ३७ हजार ६२७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. तिसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७९९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्गाचा लहरीपणा याचा मोठा फटका पिकांना बसत आहे. यासाठी राज्य शासनाने पीकविमा योजना सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हेक्टरी रकमेची अटही शिथिल करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने केवळ एक रुपयांत पीकविमा योजना सुरू केली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्हा पीकविमा नोंदणीत आघाडीवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ६०८ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यापाठोपाठ नागपूर जिल्हा आहे.

नागपूर जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार ६२७ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीकविमा काढला. वर्धा जिल्हा पीकविमा नोंदणी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७९९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

भंडारा जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ५५२, गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ७५८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. गडचिरोली जिल्हा पीकविमा नोंदणीत मागे आहे. सध्या या जिल्ह्यात ६६ हजार ४३३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. आतापर्यंत पूर्व विदर्भात १० लाख ९८ हजार ७७७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

खरीप हंगामात एक जुलैपासून पीकविमा काढण्यास सुरवात झाली. १५ जुलै पीकविमा काढण्याची मुदत होती. मात्र, पीकविमा योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने झाली. याबाबत कृषिमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले होते. त्याची दखल घेत आता ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत आहे.

पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र, धानपट्ट्यात अजूनही पाहिजे त्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीकविमा काढून पीक संरक्षित करण्याची गरज आहे. योजनेला मुदतवाढ मिळाल्याने आकडा अजून वाढणार आहे.

- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT