चंद्रपूर : चालत्या कारला लागली आग; ड्राइव्हरच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला sakal
विदर्भ

चंद्रपूर : चालत्या कारला लागली आग; ड्राइव्हरच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

आगीत कारचे पन्नास हजारपेक्षा जास्त नुकसान झाले असण्याची शक्‍यता आहे

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : आसिफाबाद राज्य महामार्गावर सुमठाणा फाट्यानजीक संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास फोर्ड कंपनीच्या एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे की, राजुरा येथिल जनपल्लीवार नामक युवक संध्याकाळी 6 च्या सुमारास आपल्या फोर्ड कंपनीच्या गाडी क्रमांक MH 02 BJ 9755 कारने विरूर स्टेशन येथे जाण्यास निघाला असता सुमठाणा टी पॉईंट पासुन जवळपास अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला कारच्या समोरच्या भागातून धूर निघत असल्याचे जाणवले.

कार मधे काहीतरी जळत असल्याची जाणीव होताच त्याने रस्त्याच्या कडेला कार उभी करून तात्काळ सोबत असलेल्या मित्रासह बाहेर पडला व कार बंद केली. आग विझविण्यासाठी कार चे बॉनेट उघडण्याचा प्रयत्न करूनही बॉनेट उघडण्यात यश आले नाही. दरम्यान कारला आग लागल्याचे कळताच काही वाहने थांबली व ही माहिती मिळाल्यामुळे राजुरा येथिल काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाठीमागून येणारे पत्रकार सागर भटपल्लीवार, अमित जयपूरकर, फारुख शेख यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

आगीत कारची बॅटरी जळाली त्याचप्रमाणे इतर भाग सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असुन ह्या आगीत कारचे पन्नास हजारपेक्षा जास्त नुकसान झाले असण्याची शक्‍यता आहे मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT