crime news esakal
विदर्भ

रस्त्याच्या वादातून भाऊ-वहिनीचा खून

पाथरी पोलिसांनी केली लहान भावास अटक; गायडोंगरीतील घटनेने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

सावली : अंगणातील रस्त्याच्या क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठा भाऊ व वहिनीचा सबलीने मारून खून केला. तालुक्यातील गायडोंगरी येथे सोमवारी (ता. ५) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्हा हादरला. मनोहर गुरनुले (वय ६२), शारदा गुरनुले (वय ५८) अशी मृतांची नावे आहेत. पाथरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी धनराज गुरनुले याला अटक केली.

मिळालेल्या माहितीवरून, गायडोंगरी गावातील मनोहर गुरनुले आणि त्यांचा लहान भाऊ धनराज गुरनुले यांच्यात घरातील अंगणातून गेलेल्या रस्त्याचा वाद सुरू होता. सोमवारी रस्त्यावरून सुरू झालेल्या वादाने टोक गाठले. रागाच्या भरात धनराज गुरनुले याने सबलीने मोठा भाऊ मनोहर गुरनुले यांना मारहाण केली. धनराज पतीला मारहाण करीत असल्याचे पाहून पत्नी शारदा मनोहर यांना वाचविण्यासाठी गेल्या. मात्र, रागात असलेल्या धनराजने शारदा यांनाही सबलीने मारहाण करणे सुरू केले. या घटनेत मनोहर गुरनुले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर शारदा गुरनुले गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर धनराज गुरनुले तेथून पसार झाला.

गंभीर जखमी असलेल्या शारदा गुरनुले यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती पाथरी पोलिस ठाण्याला कळविण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी इंगळे, ठाणेदार मंगेश मोहाड यांनी भेट दिली. या घटनेनंतर गावातच लपून बसलेल्या धनराज गुरनुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास ठाणेदार मंगेश मोहाड यांच्या मार्गदर्शनात अशोक मोहुर्ले, नारायण येग्गावार, सूरज राऊत, प्यारेलाल देव्हारे, राजू केवट करीत आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून अंगणातून गेलेल्या रस्त्यावरून दोन्ही भावांत वाद सुरू होता. यातून कित्येकदा दोघांत भांडणे झाली. याच वादातून भावासह वहिनाचा लहान भावाने खून केला. याप्रकरणी आरोपी धनराज गुरनुले याला अटक करण्यात आली.

-मंगेश मोहाड, ठाणेदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT