विदर्भ

अपघातात तीन विद्यार्थी ठार 

सकाळवृत्तसेवा

गडचांदूर (चंद्रपूर) - नांदाफाटा वळणावर भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोन विद्यार्थी जागीच ठार, तर एकाचा रस्त्यात मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृतांची नावे विकास सहानी (वय १५, रा. हरदोना), रितिक सलाम (वय १५, इंजापूर) आणि सुमित पानघाटे (१५, रा उपरवाही) अशी आहेत. घटनेनंतर ट्रकचालकाने तेथून पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

गडचांदूरला लागूनच इंजापूर गाव आहे. या गावात गेल्या काही दिवसांपासून सप्ताह सुरू आहे. महाप्रसादाने आज शनिवारी सप्ताहाची सांगता होणार होती. त्यासाठी गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकत असलेले विकास सहानी, रितिक सलाम आणि सुमित पानघाटे हे तिघेही एमएच ३४ सी ३८३० या क्रमांकाच्या वाहनाने इंजापूरला जाण्यास निघाले. महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर तिघेही इंजापूरहून निघाले. नांदाफाटा वळणावर पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात विकास सहानी, रितिक सलाम या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमित पानघाटे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतानाच बल्लारपूर मार्गावर त्याचा मृत्यू झाला. मृत तिघेही गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात नवव्या वर्गात शिकत होते. तिघेही एकाच बेंचवर बसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT