चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार  
विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार

सकाळवृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार झाल्याची घटना समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा गावामधील रोपवाटिकेजवळ एक सांबर मृतावस्थेत आढळून आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या हद्दीतील परिसरात ही घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. पी. आत्राम, वनरक्षक ढोले, कावळे, वन्यजीव अभ्यासक उमेश झिरे यांनी शनिवारी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. आज (रविवार) सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर सांबरास जाळण्यात आले. यावेळी प्राणीमित्र मनोज रणदिवे, कांबळे, घोटे, बावनकुळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : हा, आमचा निर्णय नाही...! IND vs PAK लढतीवर बहिष्कार टाकणाऱ्या पाकच्या निर्णयावर कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया

टॅक्सीवाल्यानं ४०० मीटरसाठी १८ हजार रुपये आकारले, अमेरिकन महिलेची मुंबईत फसवणूक

Sangli Hit and Run : सांगलीत 'हिट ॲण्ड रन'चा थरार; गणपती पेठेत चार पोलिसांसह 11 जखमी, बेधुंद चालकास जमावाकडून चोप

Kolhapur Mayor :कोल्हापुरात भाजपचा पहिला महापौर आज ठरणार, उपमहापौरपद 'जनसुराज्य'ला? उपमुख्यमंत्री शिंदे-कोरे यांच्यात चर्चा

Mhaisal Panchayat Samiti : प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच धक्का! भाजप उमेदवाराच्या पतीचे हृदयविकाराने निधन; म्हैसाळ पंचायत समिती गणात शोककळा

SCROLL FOR NEXT