विदर्भ

बावनकुळे म्हणाले, ऑटोचालकाला मंत्री केले आणखी काय हवे?

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कामठी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने या वेळी आपल्याला संधी नाकारली, याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्षाने मला याच मतदारसंघातून तीनवेळा आमदार केले. दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले. पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. मी विदर्भात पक्षासाठी काम करावे, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही. काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता. मात्र, मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यावर अन्याय झाला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला माझ्या मोठ्या भावासारखे तर नितीन गडकरी वडिलांसारखे आहेत. त्यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी काम करीत राहणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीत मला काम करता येईल. त्यामुळे मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही. त्याला एबी फार्म नसल्यामुळे तो तसाही बाद होणारच होता, असेही बावनकुळे यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

IND vs IRE 1st T20I: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'डेब्यू' होणार? पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची अशी असेल Playing XI

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

Protein-Rich Moong Makhana Chaat: रोजच्या बोरींग नाश्त्याला द्या ब्रेक! 10 मिनिटांत तयार करा हा प्रोटीनयुक्त मूग-मखाना चाट

SCROLL FOR NEXT