Sharad Pawar 
विदर्भ

Sharad Pawar: "सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव भुजबळांचा, मात्र..."; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Sharad Pawar: सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करुन भाजपसोबत जाण्याचा डाव होता, असा आरोप काल (बुधवार) छगन भुजबळ यांनी केला. सात वेळा यावर चर्चा झाली होती. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, काही लोकांचा आग्रह होता ही गोष्ट खरी आहे. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा हा प्रस्ताव छगन भुजबळ यांचा होता. पण तो स्विकारला नाही. न स्विकारण्यामागे कारणही होत कारण त्याच्या पुढची स्टेप (भाजप सोबत जाण्याची) आम्हाला मान्य नव्हती.

छगन भुजबळांना महत्व देऊ नका. त्यांनी काहीही सांगितलं तरी हा प्रस्ताव आमचा नव्हता. सुप्रिया सुळे यांचा देखील नव्हता, असे पवार म्हणाले.  

ही लोक भाजपसोबत जाणार होती म्हणून शरद पवार यांनी नाराज होऊन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर शरद पवार म्हणाले, भाजपसोबत जायला आमची संमती नव्हती. खोटं बोलून भुजबळ शपथविधीला गेले असं देखील काल त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

ज्या दिवशी अजित पवारांनी बंड करुन मंत्रिपदाची शपथ घेतली त्या दिवशी आपण लोणावळ्याला आहे, असं खोटं सांगितल्याची कबुली छगन भुजबळ यांनी काल (बुधवार) दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT