file photo 
विदर्भ

मुख्यमंत्र्यांनी भूकंपग्रस्तांशी साधला संवाद

राजकुमार भीतकर/विनोद कोपरकर

महागाव (यवतमाळ) : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना मतदारसंघातील माहूर, किनवट, उमरखेड, महागाव येथे शुक्रवारी (ता. 21) रात्री सव्वानऊदरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली. तातडीने खासदार पाटील संसदेचे अधिवेशन सोडून हैदराबाद येथे विमानाने आले. तेथून त्यांनी थेट किनवट गाठले. रात्रीच भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना धीर दिला.
खासदार पाटील शनिवारी (ता. 22) यांनी किनवट, हिमायतनगर, माहूर, महागाव तालुक्‍यांतील ज्या गावांना भूकंपाचे धक्के बसले त्या गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर दिला. त्यांनी शुक्रवारी रात्री शिवनी, इसलापूर, बोधळी, किनवट आदी गावांना भेटी दिल्या. रात्री सव्वातीनदरम्यान अनेक गावांतील नागरिक भीतीमुळे शाळा, मंदिरे, खुल्या मैदानात बसून असलेले दिसून आले. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला व त्यांना भूकंपाच्या धक्‍क्‍याबाबत माहिती दिली. किनवट, सारखानी व सहेली यासह अनेक गावांत घरांच्या भिंतीला तडे गेले व घरातील भांडीकुंडी खाली पडली. लोकांमध्ये कमालीची भीती असून, लोकांना धीर देणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच मोबाईलवरून उपस्थित भूकंपग्रस्त गावातील नागरिकांशी संवाद साधत धीर दिला. भूकंपाच्या भीतीने नागरिकांनी घराबाहेरच रात्र जागून काढली. महागाव तालुक्‍याला लागून मराठवाड्यातील किनवट व माहूर तालुके आहेत. शुक्रवारी रात्री सव्वानऊदरम्यान किनवट, माहूर व महागाव तालुक्‍यातून वाहणाऱ्या पैनंगंगा नदी तिरावरील अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले. त्यात महागाव तालुक्‍यातील 26 गावांचा समावेश आहे. भूकंपसदृश धक्के बसल्याची माहिती मिळाल्यावर मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांसोबत तालुक्‍यातील धनोडा, सिरफुली, वरोडी, सावंगी आदी गावांना भेटी दिल्या. वरोडी व करंजी येथे भिंतीला तडे गेले आहेत. रात्री आलेला भूकंपाचा धक्का हा सौम्य होता. विशेष म्हणजे तालुक्‍यातील नदीकाठावरील बहुतांश गावांनाच धक्का जानवला. मात्र, त्याची तीव्रता कमी होती. त्यामुळे वित्त व जीवितहानी झाली नाही. हा धक्का चार ते पाच सेकंदच राहिला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूकंपग्रस्तांशी माझ्याच मोबाईलवरून संवाद साधला. प्रशासनाला नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, सोशल मीडियावरून लोकांनी अफवा पसरवू नये. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
- हेमंत पाटील
खासदार, हिंगोली लोकसभाक्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT