SIT 
विदर्भ

एसआयटी’मार्फत अत्याचाराची चौकशी; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महासंचालकांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया, मुबई - गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांशी चर्चा केली आहे. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत. त्यात कुठलीही हयगय होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. अंतर्गत जखमांमुळे पीडित महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित महिलेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लोधी अधिकार जनआंदोलन समितीचे अध्यक्ष राजीव ठकरेले यांनी गोदिया येथे एका पत्रकार परिषदेत केली. आरोपींनी धारदार शस्त्राने वार केल्यामुळे पीडित महिलेचे गर्भाशय तसेच अन्य अंतर्गत अवयवांना जखमा झाल्या आहेत. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पीडित महिला मृत्यूशी झुंज देत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला पीडित महिलेचे नातेवाईक व जनआंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT