विदर्भ

चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणी; आयुर्वेदिक महत्त्व

नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात(Maharashtra) फक्त चिखलदऱ्यात उत्पादित केली जाते, हे अनेकांना माहीतसुद्धा नाही. सरकारी यंत्रणेचेही या बागांकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. ब्रिटिश (British) गेल्यानंतर कोणीच कॉफीच्या बागा(Coffee plantation) लावण्याचा प्रयत्न केला नाही. तेवढ्याच कॉफीच्या बागा चिखलदऱ्यात आहेत.

विदर्भात उष्ण वातावरणापासून सुटका मिळविण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. या ठिकाणी कॉफीची लागवड होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे कॉफीची लागवड केली. आज या ठिकाणी १२० टक्क्यांहून अधिक भागात कॉफीची बाग आहे. कॉफीची झाडे ही मोठ्या झाडांच्या सावलीत वाढतात. कारण, या झाडांना ऊन सहन होत नाही. सध्या ज्या भागात कॉफीची बाग आहे, त्या भागात आंबा, वड तसेच इतर सदाहरित झाडे आहेत. त्या-त्या झाडांच्या खाली कॉफीची झाडे वाढत आहेत.

ब्रिटिशांच्या काळात इंग्रज अधिकारी रॉबिन्स याने चिखलदऱ्यात १८२० मध्ये ६० ते ७० हेक्टर क्षेत्रात लावलेली कॉफीची बाग आजदेखील जशीच्या तशीच आहे. विशेष म्हणजे, इंग्रजांनी लावलेल्या कॉफीच्या या बागेवर आदिवासी युवकांना रोजगार मिळत आहे. मात्र, या बागांची व्याप्ती वाढवून राजाश्रय मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. सध्या कॉफीच्या झाडांना लालबुंद फळे आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांना ही फळे आकर्षित करीत आहेत. ही बाग सध्या पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

कॉफीचे दोन प्रकार

कॉफीचे दोन प्रकार आहेत. अरबिका आणि रॉबस्टॉ, अशी त्यांची नावे. चिखलदऱ्यामध्ये अरबिका कॉफीची लागवड केली जाते. ही कॉफी पिल्याने वजन कमी होते, असा दावा केला जातो. १०० एकरांत ही १२० वर्षे जुनी बाग आहे. वार्षिक उत्पन्न २० ते २५ क्विंटल आहे. कॉफी पावडर बनवून स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच मुंबई व बंगळूर येथे निर्यातही केली जाते. ३०० रुपये किलोप्रमाणे बिया व ५०० रुपये किलोप्रमाणे पावडर विकली जाते.

'चिखलदरा येथील कॉफी ही ब्रिटिशकालीन आहे. महाराष्ट्र शासनाने या कॉफीच्या बागा वाढविण्यासाठी मदत करून चिखलदरा नगर परिषदेला मदत करावी. तसेच नगर परिषद कार्यालतर्फे कॉफी लागवडीसाठी आणि कॉफीच्या बागांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

- विजया सोमवंशी, नगराध्यक्ष, चिखलदरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT