Accident
Accident sakal
विदर्भ

Accident मित्राला घरी सोडणाऱ्या युवकांवर काळाचा घाला; दोघांचा जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

चिखली- साकेगांव येथील मित्राला उशीरा रात्री घरी सोडण्याकरिता गेलेल्या युवकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कार चिखली-साकेगाव रोडवरील वाघापूर जवळ रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला जावून धडकली.

धडकेमुळे वाहनातील सुनील देव्हडे (३३) यांच्यासह हर्षद पांडे (३०) दोघही रा. चिखली या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना आज (ता. ३०) रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

साकेगाव येथील पप्पू राजपूत या आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी शहरातील माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांचे धाकटे बंधू सुनील देव्हडे यांच्यासह त्यांचे मित्र हर्षद पांडे व अन्य मित्र यश वाधवानी, आकाश चिंचोले व पप्पू राजपूत हे साकेगावकडे जात होते.

पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वीफ्ट डिझायर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी भरधाव वेगात रस्त्याच्या खाली उतरून पळसाच्या झाडावर जाऊन आदळली.

वाहनाच्या धडकेमुळे रस्त्याच्या बाजुला असलेले पळसाचे झाड अक्षरक्ष: जमिनीतून मुळासकट उपटल्या खाली पडले. तर वाहन बाजुला जावून अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात सुनील देव्हडे व हर्षद पांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने अपघातातील जखमींना तातडीची मदत मिळू शकली नाही.

घटनेची माहिती चिखली पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिघाजखमींना उपचारासाठी चिखली येथे हलवले.दोघांचे मृतदेहाची उत्तरीय तपासणी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात करुन नंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

शहरातील दोन तरुणांच्या या अकाली मृत्यूनंतर देव्हडे व पांडे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्यामुळे संपूर्ण चिखली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT