Chikhli MLA shweta Mahale security guard shot and end his life Buldhana crime Sakal
विदर्भ

Buldhana News : चिखलीच्‍या आमदार महालेंच्या सुरक्षारक्षकाने स्वतःवर गोळी झाडून संपवले जीवन

अजय यांचे संपूर्ण बालपण चिखलीमध्ये गेले होते. ते आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे होते. पोलिस होण्याआधी ते होमगार्ड होते. मुंबई येथे पोलिस विभागात ते रुजू झाले होते. जवळपास चार वर्षांपासून ते अंगरक्षक म्हणून काम करीत होते.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : बुलडाणा शहरात पोलिस वसाहतीत राहत असलेल्या एका पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज ३१ जुलैला दुपारी ४.३० च्या सुमारास घडली असून अजय शंकर गिरी (४०) असे मृताचे नाव आहे. ते चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्याकडे चार वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. आज सुटीवर असताना त्यांनी आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत अजय शंकर गिरी यांना चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षेसाठी शस्त्र देण्यात आले होते. ते शहरातील पोलिस वसाहतीत राहत होते. अजय गिरी हे आज कामावर नव्हते.

दुपारी त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केला आहे. गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही दिवसापूर्वी त्यांची मुंबई येथून बुलडाणा येथे बदली झाली होती.

असे करेल वाटले नाहीः आ. महाले

अजय यांचे संपूर्ण बालपण चिखलीमध्ये गेले होते. ते आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे होते. पोलिस होण्याआधी ते होमगार्ड होते. मुंबई येथे पोलिस विभागात ते रुजू झाले होते. जवळपास चार वर्षांपासून ते अंगरक्षक म्हणून काम करीत होते.

कौटुंबिक कारणामुळे ते अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी कधी तसे सांगितले नाही. मानसिक तणावातून त्यांनी यापूर्वीही असा काही प्रयत्न केल्याचे कानावर आले होते.

मात्र, या तणावातून ते एवढे मोठे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवेल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया आमदार महाले यांनी व्यक्त केली. सायंकाळी सहा वाजता त्यांनी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात माहिती घेतली.

९ एमएम पिस्टलने झाडली गोळी

चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने ९ एमएम पिस्टल दिले होते. गिरी हे कौटुंबिक कारणामुळे नेहमीच तणावात राहायचे. आज त्यांची साप्ताहिक सुटी होती. याच दररोजच्या तणावातून त्यांनी दुपारी स्वतःकडील पिस्टलने डोक्यात गोळी मारुन घेतली. गोळी डोक्यातून आरपार गेल्यामुळे घटनस्थळीचा त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी (वय ४) असे कुटुंब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT