Boy death on birthday Boy death on birthday
विदर्भ

...अन् वाढदिवशीच मुलाचा मृत्यू; हेमने कुटुंबाच्या आनंदावर विरजण

सकाळ डिजिटल टीम

जेवनाळा (जि. भंडारा) : २५ मे २०२२ रोजी त्याचा वाढदिवस... घरात आनंदाचे वातावरण... कुटुंबीयांनी मुलाचा वाढदिवस करण्याचे ठरवले... मात्र, त्याला कसलीही कल्पना नाही... तयारीही सुरू झाली... मित्र मंडळी व नातेवाइकांना फोनवरून वाढदिवसाची कल्पना देण्यात आली... मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते... वाढदिवशीच मुलाला हिरावून नेले... मन हेलावून टाकणारी ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे घडली... शुभम धनुजी हेमने (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे... (Boy death on birthday)

प्राप्त माहितीनुसार, शुभमचा आज वाढदिवस होता. पंधरा दिवसांपूर्वीच मोठ्या भावाचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले होते. यामुळे घरी आनंदाचे वातावरण होते. आनंद द्विगुणित करण्यासाठी कुटुंबीयांनी शुभमचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. याची तयारीही सुरू करण्यात आली होती. नातेवाईक व मित्र मंडळींना फोन करण्यात आले.

मात्र, वाढदिवशीच शुभमचा मृत्यू होईल याचा कोणीही विचार केला नव्हता. दुपारी अचानक शुभमला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याला कुटुंबीय दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, वाटेतच शुभमचा मृत्यू (death) झाला. वाढदिवशीच तो जग सोडून गेला. यामुळे हेमने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

शुभम हेमने हा कृषी पदवीधारक होता. गावात चांगला मुलगा म्हणून त्याची ओळख होती. शुभमच्या अकाली मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यू पश्चात वडील, आई, दोन भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. स्थानिक स्मशानभूमीत शुभमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT