विदर्भ

‘अम्मी, अम्मी’ करीत सोडला चिमुकल्याने प्राण 

विनायक इंगळे

वानाडोंगरी -  तोंडावर होळीचा सण. घरात सणासुदीला धान्य हवे, म्हणून अम्मी गुलबक्षाची लगबग. रेशन कार्ड जीर्ण झाल्यामुळे तिला धान्य मिळाले नाही. म्हणून तातडीने गुलबक्षा भराडे ही महिला अडीच वर्षांच्या मुलाला पाळण्यात झोपवून शिधापत्रिकेची दुय्यम प्रत काढायला हिंगणा तहसील कार्यालयातील रेशन विभागात गेली. रेशन कार्ड घेते आणि लवकर घरी जाते, असे तिला वाटले. पण, नेहमीप्रमाणे तिला शिधापत्रिका मिळायला वेळ लागला. इकडे मुलगा अमिन ‘अम्मी, अम्मी’ म्हणत दूध पाण्याविना पाळण्यातच तडफडून मेला.

रायपूर हिंगणा येथील वॉर्ड क्र. पाचमध्ये हिंगणा पोलिस ठाण्यामागील वस्तीत इम्रान भराडे हे कामगार कुटुंब राहते. त्यांना अयान (वय ४) व अमिन (अडीच वर्षे) अशी दोन चिमुकली मुले आहेत. मंगळवारी (ता. १९) सकाळी इम्रान मजुरीला निघून गेला होता. मोठा मुलगा अयान शेजारी खेळत होता. दुपारी दोन वाजता अमिनला पाळण्यात झोपवून घरापासून एक किलोमीटर अंतरावरील हिंगणा तहसील कार्यालयात गुलबक्षा इम्रान भराडे शिधापत्रिकेची दुय्यम प्रत आणायला गेली.

रेशन कार्यालयात ‘ऑनलाइन’ कामामुळे दररोज लोकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गुलबक्षा यांना प्रत मिळायला थोडा उशीरच लागला. त्या साडेपाच-सहा वाजता घरी आल्यावर लगबगीने पाळण्याजवळ गेल्या. मुलाला बाहेर काढले. मुलगा काहीच हालचाल करीत नाही, हे लक्षात येताच मुलाला ताबडतोब खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्‍टरांनी तो एक तासापूर्वीच मरण पावल्याचे सांगितले. हे ऐकून गुलबक्षाच्या काळजाचे ठोके चुकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT