Child marriage stopped by child protection cell in Yavatmal 
विदर्भ

लग्न सुरू असतानाच वधू म्हणाली ‘मला शिक्षण पूर्ण करू द्या, परीक्षा द्यायची आहे’

सूरज पाटील

यवतमाळ : घाटंजी तालुक्‍यातील पांढुर्णा खुर्द येथे सोळा वर्षांच्या व दहावीत शिकत असलेल्या मुलीच्या डोक्‍यावरील वडिलाचे छत्र हरवले. यामुळे तिचे लग्न करून लवकर जबाबदारीमधून मुक्त व्हावे म्हणून बालविवाहाचा घाट घातला होता. मात्र, जबाबदार व्यक्तीने सदर मुलीचे भविष्य अंधारात जाण्यापासून वाचवले. जिल्हा बाल संरक्षण कक्षास माहिती मिळताच त्यांनी गावात धडक देत बालविवाह रोखला.

बालिकेच्या कुटुंबाला बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. पालकांना मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बालविवाह प्रतिबंध अधिनिमय २००६ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली.

शेवटी मुलीच्या कुटुंबीयांकडून बालविवाह न करण्याबाबत लेखी बंधपत्र उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष लिहून देण्यात आले. यावेळी बालिकेने ‘शिक्षण पूर्ण करू द्या, मला दहावीची परीक्षा द्यायची आहे. पुढे शिक्षण घेऊ द्या’, अशी विनवणी उपस्थितांना केली.

हा बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, आकाश बुर्रेवार, नायब तहसीलदार डी. एम. राठोड, संरक्षण अधिकारी एस. बी. राठोड, ग्रामसेविका मीना मिसाळ, तलाठी एस.पी.राऊत, अंगणवाडीसेविका मिना देठे यांनी पार पाडली.

बालविवाहाबाबत नागरिकांनी दक्ष राहावे
बालविवाहाबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, तसेच बालविवाहाबाबत माहिती असल्यास आपल्या गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ अथवा चाइल्ड लाइन १०९८ यांना माहिती द्यावी. 
- ज्योती कडू,
जिल्हा बालविकास संरक्षण अधिकारी, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT