China Has Increase Steel Prices 
विदर्भ

चीनने वाढविले लोखंडाचे भाव; अचानक २० टक्के भाववाढ  

राजेश रामपूरकर

नागपूर :  कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये झाल्याबद्दल मतप्रवाह असले तरी चीनने मात्र, टाळेबंदीच्या काळात भारतासह जगातील सर्वच देशातून लोखंडांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. टाळेबंदी उठताच देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने लोखंडाच्या दरात अचानकच २० टक्के भाववाढ झाली. चीनने लोखंडांच्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही कृती केली आहे.

वाढलेल्या दरात ग्राहकांना लोखंड खरेदी करावे लागत असून, त्याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसू लागला आहे. जानेवारी महिन्यात लोखंडाचे भाव ३८,००० रुपये टन होते. मार्च महिन्यापर्यंत या दरात किंचित चढ उतार सुरू होती. २४ मार्चला देशात टाळेबंदी लागू झाल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प पडली.

दरम्यान, लोखंडांचे उत्पादन करणे कारखाने, पायाभूत सुविधा, बांधकाम प्रकल्प बंद झालेत. टाळेबंदीमध्ये शिथिलता मिळताच चिनने भारतासह जगातील सर्वच देशातील लोखंडाची खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. लोखंड उत्पादकांनी आपल्या जवळील लोखंडाची विक्री केली.

टाळेबंदीनंतर कारखानदारांनी पुन्हा उत्पादन सुरू केले. मात्र, कच्चा मालाची मागणी अचानक वाढल्याने मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आणि दर वधारले. काही व्यावसायिकांना दर उरतील असे वाटल्याने त्यांनी उत्पादन सुरू करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, कच्चा मालाला मागणी वाढल्याने भावात अजून वाढ झाली.

कारखानदारांनी पुरवठादारासोबत केलेल्या करारानुसार माल पाठविण्याची वेळ जवळ आल्याने अखेर उत्पादकांना अधिकच्या दरात कच्चा माल खरेदी करावा लागला. लोखंडाच्या दरात वाढ झाली आणि जुन्याच दरात पुरवठादारांना लोखंडांचा पुरवठा करावा लागल्याने कारखानदारांचे मोठे नुकसान झाले. टाळेबंदीनंतर कारखाने सुरू झाले हे जरी बरोबर असले तरी चिनने सर्वाधिक लोखंड खरेदी केल्याने भाव वाढले आहेत. लोखंडाच्या दरात अजून भाव वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

लोखंडाचे भाव वाढणार 

चिनने टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोखंडाची खरेदी केली. यामुळे देशांतर्गत बाजारात लोखंडाची टंचाई निर्माण झालेली आहे. ही स्थिती लक्षात घेता कारखानदारांकडून अजून भाववाढीचे संकेत मिळू लागले आहेत. 
नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

BSNL Satellite Phone झाला लाँच! डोंगर, समुद्र, जंगलातही फुल्ल नेटवर्क; पूर, भूकंप, आपत्तीमध्येही संपर्क तुटणार नाही, किंमत फक्त...

Beed: घाटनांदूरमध्ये भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाला संपवले

SCROLL FOR NEXT