manja esakal
विदर्भ

चिनी मांजामुळे कापला विद्यार्थिनीचा गळा; १५ हजारांचा चिनी मांजा जप्त

चिनी मांज्याची विक्री होत असल्याची माहिती मिळल्यावरून वणी पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : संक्रातीच्या काळात पतंग उडविण्याचा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातो. यासाठी घातक प्रकारात मोडणाऱ्या चिनी मांज्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्यामुळे या मांज्याचा उपयोग करून पतंग उडवीत असतांना येथील एका विद्यार्थीनीचा गळा या मांज्याने कापला आहे. या घटनेची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. चिनी मांज्याची विक्री होत असल्याची माहिती मिळल्यावरून वणी पोलिसांनी कार्यवाही करून १५ हजार रुपयाचा मांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविली जाते. आकाशात पतंग उडवून दोन पतंगी मध्ये कट लावल्या जाते. या करिता बंदी असलेल्या चिनी मांजाचा उपयोग केल्या जातो. या मांजामुळे अनेक पक्षी जखमी होता तर कित्येक पक्षाचा जीव देखील जातो. त्यामुळे पक्षी प्रेमींनी या मांजावर बंदी आणण्याची मागणी केली होती. या जीवघेण्या मांजावर बंदी आणण्यात आली.

तरी देखील काही व्यावसायिक पतंगासह मांजा विक्रीचा व्यवसाय करीत आहे. दि 5 फेब्रुवारीला जैन लेआऊट परिसरात राहणारी एक विद्यार्थिनी शिकवणी वर्गाला दुचाकीवरून जातांना मांजा गळ्यात अडकूल गळा चिरला. उपचारादरम्यान तिच्या गळ्याला चार टाके सुद्धा बसले. शहरातील भारत माता चौकात मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी या दुकानावर धाड टाकून चेतन अशोकचंद बोहरा याला ताब्यात घेऊन 15 हजार रुपये किमतीचा चिनी मांजा जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

SCROLL FOR NEXT