विदर्भ

टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात सामान्यांची कामे रखडली! 

सकाळवृत्तसेवा

नागपूर -  मार्च महिन्यात अधिकाऱ्यांमध्ये टार्गेट पूर्ण करण्याची स्पर्धा लागली आहे. अनेक अधिकारी तर मार्च एण्डिंग असल्याने सध्या वेळ नाही. नंतर या असे स्पष्टपणे सांगत असून, शहरातील जनरल पोस्ट ऑफिसमध्ये (जीपीओ) येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड सहन करावा लागत आहे.

१ एप्रिल ते ३१ मार्च आर्थिक वर्ष असल्याने मार्च महिन्यात अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो. परंतु, या कार्यपूर्ततेच्या प्रयत्नात सर्वसामान्य नागरिकही भरडला जात असल्याचे  चित्र आहे. जीपीओ शाखेत आयपीपीबी बॅंकेसाठी खाते उघडायचे असो वा, बचत खात्यांचा हिशेब करायचा किंवा मग पोस्टल विम्याचे काम असो, या सर्वांच्या पूर्ततेसाठी अधिकारी सध्या व्यस्त आहेत. त्यामुळे साधारण कामाकरितादेखील जीपीओत नेहमीपेक्षा अधिक वेळ खर्ची घालावा लागत असल्याचे येथे येणाऱ्या एका व्यक्‍तीने सांगितले.  

जीपीओत व्यक्तिगत कामासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून टपाल विभागाच्या एटीएमशी संबंधित कामाकरिता जीपीओत येरझारा माराव्या लागत आहेत. अधिकारी आपल्याच कामात व्यस्त असल्याने आवश्‍यक माहिती मिळत नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे त्रस्त झालो आहे.  जीपीओतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले, अधिकाऱ्यांना दिलेले कार्य वेळेच्या आधी पूर्ण करण्यास सांगण्यात आल्याने कामाचा ताण वाढलेला आहे. सुटीच्या दिवशीही अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी जाऊन शिबिर, कार्यशाळा घ्याव्या लागत आहेत. कार्यपूर्ततेच्या प्रयत्नात अधिकारी इतके मग्न आहेत की, त्यांचे लक्ष सर्वसामान्य नागरिकांकडे जातच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT