विदर्भ

नक्षली बंदला नागरिकांचे प्रतिआव्हान

मनोहर बोरकर

एटापल्ली (गडचिरोली) : जिल्हात नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदचा नागरिकांनी विरोध दर्शवत एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अनेक ठिकाणची रस्त्यावरील आडवी टाकलेली लाकडे काढून रस्ते मोकळी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली, तसेच नक्षली बॅनर जाळून नक्षल्यांचा धिक्कार करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी माओवाद्यांविरोधी घोषणा दिल्या असून माओवाद्यांकडून पुकारलेला गडचिरोली जिल्हा बंद सामान्य आदिवासी जनतेची पिळवणूक करणारा आहे, तसेच लोकशाहीने दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत, असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली, त्यामुळे नक्षल्याच्या आव्हानाला नागरिकांनीही प्रतिआव्हान दिल्याने नक्षल्यांनी पुकारलेल्या गडचिरोली जिल्हा बंदचा प्रभाव दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान कमी झाल्याचे दिसुन आले आहे.

सकाळपासून बंद असलेली तालुक्यातील एटापल्ली ते अहेरी बससेवा सुरु करण्यात आली आहे. नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदमुळे पोलिस प्रशासनही सतर्क असून पोलिसांच्या एटापल्ली व हेडरी अशा दोन उपविभागतिल जारावंडी, कसनसुर कोटमी, हालेवारा, एटापल्ली, बुर्गी, आलदंडी, हेडरी व गट्टा अशा 9 पोलिस स्टेशनचे पोलिस जवान तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शोध मोहिमेद्वारे नक्षली हालचालीवर नजर ठेऊन आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: आज तुमच्या यादीत ठेवा 'हे' 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

UK Election: ऋषी सुनक यांनी निवडणुकीची घोषणा करून घेतली 'रिस्क'; सत्तेत येणं किती आव्हानात्मक? जाणून घ्या

RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

Latest Marathi News Update: प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT