पांढरी : सीतेपार-किसनपूर मार्गावरील धोकादायक पूल.  
विदर्भ

नागरिक किती दिवस करणार सितेपार-किसनपूर पुलावरून प्रवास...आता तरी शासनाने जागे व्हावे

जितेंद्र चन्ने

पांढरी (जि. गोंदिया) : सितेपार-किसनपूर मार्गावरील पूल वर्षभरापासून नादुरुस्त आहे. या गावांतील नागरिकांना आवागमन करण्यासाठी या पुलाव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जीव धोक्‍यात घालून आजही नागरिकांचा प्रवास सुरू आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात जोरदार पावसाने पांढरी परिसरात हजेरी लावली होती. त्यामुळे पुराने रौद्ररूप धारण केले होते. सितेपार-किसनपूर मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्याचवेळी पुलाचा खालील व बाजूचा बराचसा भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. या घटनेची माहिती तालुकास्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत वाऱ्यासारखी पसरली होती.

पुलाची अवस्था "जैसे थे'च

लोकप्रतिनिधींपासून तर, बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच लवकरात लवकर पुलाच्या दुरुस्तीचे आश्‍वासन दिले होते. या बाबीला आता वर्ष लोटला आहे. पुन्हा पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र, सीतेपार-किसनपूर मार्गावरील पुलाची अवस्था "जैसे थे' आहे.

तीन गावांना जोडणारा एकमात्र पूल

स्थानिक प्रशासनामार्फत कागदी कारवाई पूर्ण करून संबंधित विभागाला पाठविण्यात आली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कामचुकारपणा पूल दुरुस्तीला भोवल्याचे बोलले जात आहे. सीतेपार ही गटग्रामपंचायत असून, यामध्ये किसनपूर व शिकारीटोला या गावांचा समावेश आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 1121 एवढी लोकसंख्या आहे. हा पूल तीन गावांना जोडणारा एकमात्र असून, शेतकरी, विद्यार्थ्यांपासून तर स्थानिक नागरिकांना प्रवासासाठी अतिमहत्त्वाचा आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी वेळीच लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

असं घडलंच कसं : बदली कर्मचारी ठाण मांडून; तरीही होणार कार्यशाळा..वाचा सविस्तर...


साहेब, वाट कसली पाहता...!

वर्षभरापासून पुलाची दुरुस्ती करण्यास बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे. एखादा अपघात किंवा घटना घडल्यावर तुम्हाला जाग येईल काय? पूल दुरुस्तीसाठी कसली वाट बघतायं, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT