City Bus
City Bus 
विदर्भ

शहर बसच्या संपूर्ण टप्प्याचा भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शहर बसच्या संपूर्ण टप्प्याचा भाडेवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने फेटाळून लावला. प्राधिकरणाने केवळ पहिल्या पाच टप्प्याच्या भाडेवाढीला हिरवा कंदील दाखविला. त्यावरील टप्प्याच्या भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे  प्रस्ताव पाठवावा, असे नमूद करीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने महापालिकेला चपराक  लावली. त्यामुळे किरकोळ भाडेवाढीचा भार नागपूरकरांना सहन करावा लागणार आहे. 

पालिकेने २०१४ पासून शहर बसच्या भाड्यात वाढ केली नसल्याचे कारण पुढे करीत परिवहन समितीने ऑगस्टमध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर मागील महिन्यात सभागृहातही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यात २५ टक्के भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. शहर बस भाडेवाढीचा हा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सभापती व जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी फेटाळून लावला. 

राज्य सरकारने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वातील कमाल भाडेवाढीपेक्षा ही वाढ जास्त असल्याचे ताशेरे सभापतींनी ओढले. त्यामुळे केवळ पाच टप्प्यासाठी भाडेवाढीला हिरवा कंदील दाखविण्यात आला असून उर्वरित २० टप्प्याच्या भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे संपर्क साधावा, असा सल्लाही मुद्‌गल यांनी महापालिकेला दिला. 

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दोन ते चार किमीचा टप्पा ते १० ते १२ किमीपर्यंतच्या पाच टप्प्यात भाडेवाढीला मंजुरी दिली. राज्य सरकारने निश्‍चित केलेल्या किमान व कमाल भाडेवाढीच्या मार्गदर्शक तत्त्वाकडे दुर्लक्ष करीत महापालिकेच्या परिवहन विभागाने भाडेवाढीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविल्याने काही अधिकाऱ्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

भाडेवाढीचे कमाल दर व प्रस्तावित दर 
किमी    कमाल दर    प्रस्तावित दर 
    (रुपयांत)    (रुपयांत)

२ ते ४    १०    १० 
४ ते ६    १४    ११
६ ते ८    ११    १४
८ ते १०    १८    १६ 
१० ते १२    २२    २० 

नामंजूर केलेले भाडेवाढीचे काही टप्पे 
किमी    कमाल दर    प्रस्तावित दर 
    (रुपयांत)    (रुपयांत)

० ते २    ८    १०
१२ ते १४    २२    २४
१६ ते १८    २६    ३३
२४ ते २६    ३४    ४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT