विदर्भ

Buldhana: दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश कंठेंचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Latest Buldhana News : मही नजीक त्यांना छातीत वेदना होत असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

Deulgaon Raja: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश यू कंठे वय ४५ यांचे आज (ता.२४) सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते बुलडाणा येथे जात असताना देऊळगाव मही नजीक त्यांना छातीत वेदना होत असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

बुलढाणा जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात सहभागी होण्यासाठी ते आपल्या सहकारी न्यायाधीश यांच्यासोबत कार ने निघाले असता देऊळगाव मही नजीक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी डॉक्टर सोनसळे यांच्या दवाखान्यात दाखल केले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र वेदना झाल्या व ते खाली कोसळले.

दरम्यान त्यांना तात्काळ चिखली येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान त्यांना आज सकाळी छातीत दुखयला लागले मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे देऊळगाव राजा येथे विश्रामगृहावर येणार असल्याने घाईगडबडीत ते बुलडाणा येथे जाण्यासाठी निघाले असता देऊळगाव महीनजी त्यांना हृदय विकाराचा त्रास तीव्र झाला.श्री कंठे हे मूळचे मिरज जिल्हा सांगली येथील होते. गत दोन वर्षांपासून ते देऊळगाव राजा दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT