Clean-India.jpg
Clean-India.jpg 
विदर्भ

आली-आली स्वच्छता दिवाळी आली...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारीरोजी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘स्वच्छता दिवाळी’ साजरी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच सरपंचांसह ग्रामपंचायत सचिवांनी आपापल्या गावांत स्वच्छता दिवाळी साजरी करतील. ग्रामसभा आणि चर्चेच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा संदेश सुद्धा देतील. 

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

मानवसेवा हीच खरी सेवा, असा उपदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हाती झाडू घेवून स्वच्छतेची मशाल पेटवत ठेवली. महान समाजसुधारक असलेले महात्मा संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त गत वर्षी 23 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच सरकारी, खासगी शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला होता.

यावर्षीही तोच उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 15 ते 23 फेब्रुवारीदरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. 23 फेब्रवारीरोजी संत गाडगेबाबा यांची जयंती असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. 

स्वच्छतेच्या जागरासाठी दिल्या सूचना

  • 23 फेब्रुवारीरोजी स्वच्छता दिवाळी साजरी करण्यात यावी, यासाठी 22 तारखेला ग्रामीण भागातील कुटुंबातील सदस्यांनी आपले घर व परिसर स्वच्छ करावा. 
  • गाजर गवत इत्यादीचे निर्मूलन करावे. केर कचऱ्याची विल्हेवाट लावावी. 
  • संत गाडगेबाबा जयंतीच्या दिवशी 23 तारखेला सकाळी सडा सारवण करून अंगणात रांगोळी काढावी. त्या रांगोळीवर दिवा लावावा. 
  • शाळा आणि ग्राम पंचायत सदस्यांनी गावातून प्रभातफेरी काढावी आणि गाडगेबाबांचा जयघोष करावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT