file photo 
विदर्भ

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र का थांबले? ...वाचा, हे आहे कारण

राहुल मैंद

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : शहरात दर रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा गुरांचा बाजार कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य माणसाचे जणू अर्थचक्र थांबले आहे.

लॉकडाउनमुळे रोजगार ठप्प असताना जनावरांची खरेदी-विक्री करून त्यातून पैसा उभारण्याचा मार्गही बंद झाला आहे. यापूर्वी जनावरांच्या खरेदी-विक्रीमध्ये गुंतविलेला पैसासुद्धा चार महिन्यांपासून अडकून पडला आहे.

शेतकऱ्यांची मोठी पंचाईत

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज भाजीपाला गुजरी भरते. याच ठिकाणी गुरांचा बाजार भरत होता. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून तो बंद आहे. त्यामुळे काही महिने जनावरांचे पालनपोषण करून खरीप हंगामाच्या तोंडावर विकणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

काही शेतकरी वर्षभर जनावरांचे व्यवस्थित पालनपोषण करतात. खरीप हंगाम तोंडावर आला की जनावरे विकतात. पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना बांधण्याची अडचण येत असते. त्यामुळेही काही शेतकरी जनावरे विकून टाकतात. परंतु कोरोनामुळे यावर्षी गुरांचा बाजार बंद असल्याने जनावरांना विकून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच जागेची अडचण असणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

आर्थिक अडचणीला तोंड

लॉकडाउन होण्यापूर्वी ज्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार केले होते. त्यांचा पैसा अडकून पडला असल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची आणि शेतीसाठी, घरगुती वापरासाठी लागणारी सर्व साहित्याची दुकाने सुरू आहेत. मात्र, गुरांचा बाजार अद्याप सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे अनेकांचे अर्थचक्र थांबले आहे.

लॉकडाउनचा परिणाम पथ्यावर

शहरातील गुरांचा बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात चांगला भाव मिळत असल्याने जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी येथे येतात. गायी, म्हशी, शेळ्या, बोकड ही जनावरे खरिपापूर्वी बाजारात विकून पेरणीच्या कामासाठी पैसा उभा करण्याचा मार्ग अनेक शेतकरी अवलंब करतात. यावेळी लॉकडाउनमुळे गुरांचा बाजार भरलाच नाही.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

Parner News : गडरक्षण हीच खरी शिवसेवा! खासदार छत्रपती शाहु महाराज

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

SCROLL FOR NEXT