Eknath Shinde Ajit Pawar esakal
विदर्भ

Ajit Pawar News : अजित पवार खरंच नाराज आहेत का? CM शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

रोहित कणसे

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात देखील या घटनेमुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. यादरम्यान जालन्यातील घटनेमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

आज राज्य सरकारचा बुलढाणा येथे 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चांना विराम दिला आहे.

आज देवेंद्र फडणवीस लेह लडाखला आहेत. अजित पवारांची तब्येत कालपासून गिरीष महजन यांनी सांगितलं त्याप्रमाणे बरी नाहीये. पण लोक सुरू करतील दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर, असं काही नाही आमच्यामध्ये एकदम फेवीकॉलचा मजबूत जोड आहे. हे सरकार घट्ट आहे. या सरकारला कुठेही अडचण नाहीये असे मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बुलढाणा येथे आपला १५ वा कार्यक्रम होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमतून १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, संजय राठोड, संजय गायकवाड इत्यादी नेते देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT