विदर्भ

मध्यस्थीसाठी मुख्यमंत्री संघ दरबारी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. 
मुख्यमंत्री रात्री नऊ वाजताच्या सुमारास विमानाने नागपूरला दाखल झाले. तेथून ते थेट संघ मुख्यालयात गेले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते मुख्यालयातून बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांनी सरसंघाचालकांची भेट घेतली असली तरी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यास कुठलाच दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात संघाने मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री आले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. 
भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर युतीचे सरकार स्थापन होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी शिवसेनेला प्रस्तावसुद्धा मागितला आहे. मात्र, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले आहे. त्यांनी लातूर येथे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा दावा केला. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा "फिफ्टी-फिफ्टी'चे स्मरण देऊन भाजपलाच प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. 
सिलसिला भेटीगाठींचा 
शिवसेना एक पाऊलही मागे घेण्यास तयार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला तरी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. शिवसेनेने साथ दिली नाही तर सरकार पडण्याची नामुष्की ओढवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी आल्याचे चर्चा आहे. विशेष म्हणजे सोमवारी फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचीसुद्धा भेट घेतली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT