नगरपालिका प्रशासनाकडून भगव्या झेंडे काढण्यावरून आक्षेप Sakal
विदर्भ

Lok Sabha Poll 2024 : नगरपालिका प्रशासनाकडून भगव्या झेंडे काढण्यावरून आक्षेप; बजरंग दलाची तक्रार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने आपल्या पालिका कर्मचाऱ्यांना शहरातील भगवे झेंडे उतरवण्याचे आदेश दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

कारंजा -लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने आपल्या पालिका कर्मचाऱ्यांना शहरातील भगवे झेंडे उतरवण्याचे आदेश दिले होते.मात्र पालिका प्रशासनाला भगवा ध्वज उतरवने ही पद्धत माहीत नसल्याचे दिसून येत आहे.

असा आरोप बजरंग दलाने केला. प्रशासनाने बांबूला हुक जोडून शहरातील प्रत्येक घरावरील भगवान श्री रामाचे चित्र असलेला भगवा ध्वज बाहेर काढला आणि तो फाडून भगवा ध्वज विद्रूप केला असा आरोप तक्रारीत केला आहे.

नगरपालिका प्रशासनाने काढलेल्या झेंड्यांची संख्या ५००च्यावरआहे. त्यांनी हे काढलेले झेंडे नगरपरिषदेत नेऊन टिनाच्या छपरावर फेकून दिले. कारंजा शहरात फक्त भगवा ध्वज काढण्यात आला असून इतर रंगांचे झेंडेही लावण्यात आले आहेत.

महापालिका प्रशासनाला हे न दिसणारे आहे का,पालिका कर्मचाऱ्यांनी हा भगवा ध्वज काढून संताप व्यक्त केला का, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, येथील पोलीस स्टेशन आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदींकडे लेखी तक्रारीत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: ५ मुख्यमंत्री, ४ सिनेस्टार अन्...; बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील किती नेते?

Kapil Sharma Cafe Firing VIDEO : कॅनडात कपिल शर्माच्या ‘Kaps Caffe’वर तिसऱ्यांदा गोळीबार ; लॉरेन्स गँगने घेतली जबाबदारी!

Gevrai News : गेवराईचे माजी आमदार मशाल सोडून घेणार कमळ हाती, ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना(युबीटी)ला मोठा हादरा

Diwali Bonus: दिवाळीआधीच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्र सरकारकडून बोनस जाहीर, पण किती?

Punjab DIG Arrest by CBI : मोठी बातमी! पंजाबच्या 'DIG'ना पाच लाखांची लाच घेताना ‘CBI’ने रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT