dilevary 
विदर्भ

कडाक्‍याच्या थंडीत "ती' होती विव्हळत आणि... 

गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : प्रसूतीसाठी दवाखान्यात जात असताना एका महिलेने बुधवारी (ता. आठ) सकाळी सात वाजताच्या सुमारास कडाक्‍याच्या थंडीत भर रस्त्यावर गोंडस बाळाला जन्म दिला. पण तत्पूर्वी ती दोन दवाखान्यांमध्ये प्रसूतीसाठी गेली. परंतु दोन्ही ठिकाणी डॉक्‍टरच गैरहजर होते. त्यानंतर तिसऱ्या दवाखान्यात जात असताना रस्त्यातच तिला जोरदार प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि अखेर तिची रस्त्यातच सुखरूप प्रसूती झाली. त्याचमुळे रस्त्यावरील जन्माला दैवाची साथ मिळाल्याचे प्रत्येकजण बोलत होता. 

गरोदर महिला प्रसूतीसाठी कुटुंबासह निघाली 

अकोट तालुक्‍यातील महागाव येथील एका पारधी कुटुंबातील महिलेला प्रसूतीसाठी परिवारातील महिला व काही पुरुष एका वाहनातून बुधवारी (ता. आठ) अंजनगावात भल्या पहाटे प्रसूतीसाठी घेऊन आले. ते प्रथम टाकरखेडा मार्गावर असलेल्या एका दवाखान्यात गेले. तेथे त्यांना डॉक्‍टर नसल्याचे सांगण्यात आले. नंतर ते अकोटकडे जाणाऱ्या मार्गावरील एका मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आले; परंतु तेथील डॉक्‍टरही बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ती महिला तिसऱ्या दवाखान्यात जाण्यासाठी परत गाडीकडे जात असताना तिला जोरदार प्रसूतीकळा सुरू झाल्या. 

अवश्‍य वाचा- तु है मेरी किरण..

...अन्‌ सिनेमास्टाईल घडला प्रसंग

कडाक्‍याच्या थंडीत त्या महिलेचा आकांत पाहून परिवारातील महिलांनी मोठ्या हिमतीने सिनेमातील एखाद्या दृष्याप्रमाणे सहकार्य करीत तिची भररस्त्यावर सामान्य प्रसूती घडवून आणली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगा झाला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद खेळायला लागला. लगेचच कोणीतरी पेढे आणले व तोंड गोड केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT