File photo
File photo 
विदर्भ

कृषी विभागाला जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील काही भागात गुलाबी बोंडअळी तसेच फवारणीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फिल्डवर जाण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून कृषी विभाग बांधावर पोहोचला की नाही, यांची उलटतपासणी स्वत: जिल्हाधिकारी करणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा कपाशीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसला होता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या फवारणीत शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली. यात अनेकांचा मृत्यू झाला. यंदा काही भागात गुलाबी बोंडअळी आढळली आहे. तसेच फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटनाही घडल्या. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची जनजागृती करण्याची तंबी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कृषी विभागाला दिली. फवारणी करताना सुरक्षाकिटचा वापर, प्रतिबंधित औषधांची होणारी विक्री, बोंडअळीवर नियंत्रण याबाबत शेतकऱ्यांची जनजागृती करण्याची मोहीम प्रशासनाने घेतली आहे. काही भागांत साहित्य पोहोचले नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. अनेक कंपन्यांना तालुके दत्तक दिल्यानंतरही त्या भागात जनजागृती होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी कृषी विभागाला जनजागृती करण्याबाबत तंबी दिली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावा-गावांत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच सुरक्षाकिटचे महत्त्व पटवून देण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट तपासणीचे संकेत दिले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात जनजागृती तसेच साहित्य वाटपाची स्थितीची माहिती घेणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून कृषी विभाग कामांला लागला आहे. कामात कसूर करणाऱ्यावर कारवाईचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाले आहे. त्यामुळे नावापुरते "व्हिजिट'करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 
काही कर्मचारी रडारवर
जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीत ज्या भागात समाधानकारक काम दिसणार नाही, असे कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर राहणार आहे. जनजागृतीत कसूर करणाऱ्यांवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कधीही आकस्मिक भेट देणार असल्याने अनेकांची "पोल खोल' होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT