Collector announced new policy for vegetable selling 
विदर्भ

अमरावतीत या पद्धतीने होणार भाजीपाला विक्री... जाणून घ्या

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ यार्डात भाज्या व फळांच्या घाऊक विक्रीसाठी मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र दिवस निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी (ता. आठ) जारी केला.

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाउनमध्ये आवश्‍यक व्यवहारांना गती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने शिथिलीकरण केले जात आहे. त्यानुसार बाजार समितीच्या आवारात घाऊक विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळ यार्डमध्ये प्रत्येक आठवड्याच्या रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार यादिवशी भाजीपाला बाजार तर सोमवार, बुधवार आणि शनिवारी फळबाजार व बटाटे- कांद्याची घाऊक विक्री सुरू राहील. व्यापाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. यार्डात केवळ घाऊक विक्री करता येईल. किरकोळ विक्रीची परवानगी नाही. बाजार समितीच्या आवारात एकेरी वाहतूक ठेवण्याचे निर्देश आहेत.

मुख्य यार्डातील मुख्य प्रवेशद्वार आवक करण्यासाठी वापरता येईल. या मार्गाने एकेरी वाहतूक पुढे जात फळे बाजार गेटने बाहेर जाईल. मास्क असल्याखेरीज कुणालाही बाजार समितीत प्रवेश करता येणार नाही. प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्सचे व इतर उपाययोजनांचे पालन करण्याचे निर्देश बाजार समितीला देण्यात आले आहेत. या नियमांचा भंग झाल्यास बाजार सुरू करण्याची परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे. सदर्हू आदेश 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Latest Marathi News Live Update : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 16 हजार 717 पदांसाठी होणार भरती

Tamil Nadu News: तमिळनाडूतील नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे अन् रेशमी साडी; सरकारची नवी योजना

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

SCROLL FOR NEXT