रवींद्र ठाकरे  
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, तक्रार आल्यावर सोशल मीडियावरील पोस्टची दखल 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तक्रार आल्यावर सोशल मीडियावरील पोस्टची दखल घेऊन आवश्‍यक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 
सोशल मीडियावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून जोरात प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग होत असल्याने निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांचे सोशल मीडियाच्या खात्यांची उमेदवारी अर्जातच माहिती सादर करण्यास सांगितले होते. सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेलही तयार केले आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग करण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. सोशल मीडियावर होणारा खर्च उमेदवारांच्या खात्यात जोडला जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून, 146 उमेदवार रिंगणात आहे. यातील 106 उमदेवारांनी सोशल मीडियाच्या खात्याची माहिती दिली आहे. 
सोशल मीडियावर 38 उमेदवार सक्रिय आहेत. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सेल तयार करण्यात आला. त्यांच्या पोस्टवर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. विनापरवानगी सोशल मीडियाचा उपयोग होत असला तरी विभागाकडून स्वत:हून दखल घेऊन कारवाई करणे शक्‍य नाही. तक्रार आल्यावरच कारवाई करता येते, असे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT