file photo 
विदर्भ

सवाल अनुकंपाधारकांचा, तुम्हीच सांगा किती वर्षे करायची नोकरीची प्रतीक्षा 

प्रकाश गुळसुंदरे

परतवाडा(अमरावती) : शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या काही जिल्हा परिषदेच्या नियोजनाअभावी राज्यातील हजारो अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत असून यातील अनेकांची वयोमर्यादा संपत आहे. त्यामुळे आपण वंचित तर राहणार नाही ना, या विवंचनेत अनुकंपाधारक असून परिवाराचा उदरनिर्वाह करणेही सध्या कठीण झाले असल्याची व्यथा त्यांनी "सकाळ'कडे मांडली. 

15 वर्षांपासून ते नोकरीच्या प्रतीक्षेत 
शासकीय सेवेत असताना नोकरी कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाच्या आधाराकरिता शासनाकडून एकाला शासकीय नोकरी दिली जाते. काही ठिकाणी जरी याबाबत व्यवस्थित नियोजन होत असले तरी अनेक विभागांमध्ये दिसत नाही, तर अनुकंपाधारकांची भरती न झाल्याने गेल्या 10-15 वर्षांपासून ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील अनेकांनी 45 वर्षांची वयोमर्यादा संपत असल्याने आपण वंचित तर राहणार नाही ना? असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. त्यात नुकताच वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी कुठल्याही नवीन पद्धतीची भरती करू नये, असे आदेश काढले आहेत. परंतु नोकरभरतीवर बंदी असली तरीही अनुकंपाधारकांसाठी ती लागू नसते, असे उच्च न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी अनुकंपाभरतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अनुकंपाधारकांकडून होत आहे. राज्यातील शेकडो अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत असून लवकरात लवकर अनुकंपाधारकांची पदभरती करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील हजारो अनुकंपाधारकांची आहे. 

अनुकंपाधारकांचा प्रश्‍न शासनदरबारी मांडणार 
-अनुकंपाधारक संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष सचिन शेंडे यांनी ही बाब आमदार रोहित पवार यांच्यासमोर ट्विटरद्वारे मांडली. रोहित पवार यांनी अनुकंपाचा प्रश्‍न शासनदरबारी मांडू. लवकरच तुमची पदभरती सुरळीत सुरू करू, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे अनुकंपाधारकांच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

यावर्षी वयोमर्यादेतून बाद होणाऱ्यांची संख्या शेकडोत आहे. सरसकट पदभरती बंदी अनुकंपाधारकांना लागू नसते. उच्च न्यायालयाचा विचार करून वित्त विभागाने 4 मे 2020 रोजीच्या शासननिर्णयातून अनुकंपाधारकांची भरती वगळून न्याय द्यावा. 
-सचिन शेंडे, प्रदेश उपाध्यक्ष, अनुकंपाधारक संघ महाराष्ट्र. 


शासनादेश असतानासुद्धा जिल्हा परिषद अमरावती यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 
-हेमंत तायडे, जिल्हा सचिव अनुकंपाधारक संघ महाराष्ट्र. 

विदर्भातील रिक्त पदे 

  • यवतमाळ ः 360 
  • अमरावती ः 310 
  • गोंदिया ः 280 
  • चंद्रपूर ः 260 
  • गडचिरोली ः 140 
  • भंडारा ः 191 
  • अकोला ः 169 
  • वाशीम ः 112 
  • वर्धा ः 83 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT