file photo 
विदर्भ

महाबीजच्या न उगविणाऱ्या बियाण्यांबाबत तक्रारी वाढल्या...सांगा शेतकऱ्यांनी कशी करावी पेरणी?

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : बियाण्यांबाबत महाबीजवर असलेला विश्‍वास दिवसागणिक कमी होत असल्याचे दिसून आले आहे. यंदा तर महाबीजचे बियाणे उगविले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत महाबीजच्या वतीने शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेले बियाणे परत घेत तक्रारी असलेल्या शेतकऱ्यांना नव्याने बियाणे देण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने तशी नोटीस महाबीजला बजावली आहे.

महाबीजचे बियाणे घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडून ते उगविले नसल्याच्या तक्रारी घेण्यात आल्या आहेत. या सोबतच बऱ्याच खासगी कंपन्यांच्या तक्रारीही आल्या आहेत. या तक्रारीवरून कृषी विभागाकडून महाबीजला नोटीस देत तक्रार असलेले बियाणे परत घेण्याची ताकीद देण्यात आली आहे. यानुसार महाबीजकडून आतापर्यंत 42 बॅग परत घेण्यात आल्या आहेत. महाबीजच्या बियाण्यांबाबत आतापर्यंत सुमारे 60 शेतकऱ्यांकडून 90 क्‍विंटल बियाण्याच्या तक्रारी आहेत. ते बियाणे परत घेण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना तेवढेच बियाणे पुरविणार

ेशेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बियाणे परत घेत त्या शेतकऱ्यांना तेवढेच बियाणे पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची तयारी महाबीजकडून करण्यात आली असून बाजारात तेवढा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. महाबीजकडून पुरविण्यात आलेल्या बियाण्यांपैकी केवळ 90 टक्‍के बियाण्यांच्या तक्रारी आहेत. उर्वरित बियाण्यांबाबत कुठलीही तक्रार नाही. यामुळे महाबीजचे बियाणे उगवीत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरत असल्याचे महाबीजकडून सांगण्यात आले आहे. शासनाचे बियाणे कंपनी म्हणून महबीजकडे शेतकरी आणि इतर व्यक्‍ती बघतात. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, असा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जाणून घ्या  : भंडारा जिल्ह्यातील नंदा, कान्हा गवळी मंदिर आणि त्याची परंपरा

ईगल आणि महाबीजच्या तक्रारी अधिक

बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत सर्वाधिक तक्रारी ईगल या खासगी वाणासह महाबीजच्या आहेत. बऱ्याच भागात या दोन कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगविले नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कृषी विभागाकडून या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून बियाणे उगविले नाही त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्याचे बजावण्यात आले आहे.

15 हजार क्‍विंटलची होती मागणी

खरीप हंगामात महाबीजला 15 हजार क्‍विंटल बियाणे पुरविण्यासंदर्भात महाबीजला आदेशित करण्यात आले होते. परंतु, त्यांच्याकडून केवळ सात हजार क्‍विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. यातही पुरविण्यात आलेल्या बियाण्यांत उगवण क्षमतेबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत.
 

बियाण्यांसंदर्बात चौकशी करणार
जिल्ह्यात महाबीज आणि ईगल कंपनीच्या बियाण्यांबाबत तक्‍र्रारी आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्याचे बजावण्यात आले आहेत. शिवाय महाबीजला पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून बियाण्यासंदर्भात चौकशी करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
- संजय बमनोटे, जिल्हा कृषी अधिकारी, जि. प.

90 क्‍विंटलच्या बियाण्यांबाबत तक्रारी
महाबीजच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात सात हजार क्‍विंटल बियाणे पुरविण्यात आले आहेत. त्यापैकी 90 क्‍विंटलच्या बियाण्यांबाबत तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत सोयाबीनच्या 30 किलो वजनाच्या 42 थैल्या परत घेण्यात आल्या आहेत. बियाणे परत घेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे परत करण्यात येणार आहे.
- अजय फुलझेले
जिल्हा व्यवस्थापक, महाबीज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT