lockdown
lockdown 
विदर्भ

आजपासून या गावांमध्ये आठ दिवस कम्प्लिट लॉकडाउन!

राजकुमार भीतकर

यवतमाळ : जून अखेरपर्यंत पुसदमध्ये कोरोनाची साखळी तुटण्याची अपेक्षा असताना जुलैच्या शेवटच्या टप्प्यात रुग्णसंख्या अचानक वाढल्याने पुसद शहराची वाटचाल हॉटस्पॉटकडे होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुसद शहर व आजूबाजूच्या परिसरात बुधवारपासून (ता.22) आठ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान बाजारपेठ बंद राहणार असून नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी केले आहे.

पुसद व दिग्रस या दोन्ही तालुक्‍यांत कोरोना पॉझिटिव्ह बाधितांचा आकडा फुगत चालला आहे. त्यामुळे पुसद व दिग्रस ही शहरे आठ दिवसांसाठी लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी आलेल्या अहवालानुसार रामनगरजवळील सिंधी कॉलनीतील एकाच कुटुंबातील सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. रामनगर 13, पार्वतीनगर एक व पुसद येथील एका प्रतिष्ठानामधील पाळोदी येथील एक कामगार असे 15 जण पॉझिटिव्ह आले असून, सोमवारपर्यंत ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह संख्या 52 झाली आहे. एकूण तालुक्‍यातील पॉझिटिव्ह संख्या 70 असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. येथील तीन रुग्ण ज्येष्ठ व अन्य रोगांनी ग्रस्त होते, तर चौथा रुग्ण 52 वर्षीय शिक्षक होता. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही वाढली असून, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

दिग्रस शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खबरदारी म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. संचारबंदीदरम्यान सर्व शासकीय व खासगी दवाखाने व औषधी दुकाने सुरू रहाणार आहेत. सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते आठ या कालावधीत फक्त दूध विक्रेत्यांना मुभा राहील. याव्यतिरिक्त भाजीपाला, फळ व किराणा दुकानांसह शहरातील इतर सर्व व्यवसाय कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांसह प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर व गल्ली मोहल्ल्यात एकत्र येऊन गोष्टी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संचारबंदीदरम्यान कुणीही घराच्या बाहेर पडून दंडात्मक व दंडुक्‍याच्या कारवाईत सापडू नका, घरात राहा सुरक्षित राहा प्रशासन व आरोग्य विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव हाणून पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रतिसाद
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वसंतनगर पोलिस ठाण्याच्या आवारात सभा घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार, ठाणेदार प्रदीप परदेशी, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. आठ दिवसांच्या लॉकडाउनची मागणी आमदार नीलय नाईक, डॉ. वजाहत मिर्झा, इंद्रनील नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. अखेर प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रतिसाद देत लॉकडाउनचा निर्णय घेतला.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT