The concrete road was demolished ; a man will cost three months imprisonment 
विदर्भ

काँक्रीट रस्ता फोडणे आले मुळावर भोगावा लागणार तीन महिन्यांचा कारावास

सकाळवृत्तसेवा

मालेगाव (वाशीम) : काँक्रीट रस्ता फोडून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी तालुक्‍यातील घाटा येथील रामदास सोमटकर यांना तीन महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा सोमवारी (ता.20) येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी व्ही. बी. मुल्ला यांनी ठोठावली आहे.
तालुक्‍यातील घाटा येथील ग्रामसेवक कैलास आदमने यांनी शिरपूर पोलिसात ता. 13 डिसेंबर 2014 ला फिर्याद दिली होती की, ता. नऊ सप्टेंबर 2014 ला सकाळी रामदास सोमटकर यांनी कॉंक्रीटचा सार्वजनिक रस्ता फोडून त्यावर खड्डा खोदला. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. याचा तपास नायक पोकॉ अनिल भगत यांनी केला. याबाबत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी व्ही. बी. मुल्ला यांनी निर्णय दिला की, रामदास निवृत्ती सोमटकर यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलमानुसार सार्वजनिक नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरविण्यात येवुन, त्यांना तीन महिने साधी कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंड देण्यास कसूर केल्यास पुन्हा एक महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमानुरा ग्रामपंचायत घाटा दंडातील रक्कम अडीच हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून अपील कालावधी नंतर मिळण्यास हक्कदार राहील, असे आदेशात म्हटले आहे. सरकार तर्फे ॲड. ए. एम. मिर्झा व ॲड. बी. एल. इंगळे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT