यवतमाळ - नव वधू-वराना शुभेच्छा देताना जिल्हाधिकार एम देवेंदर सिंह, सोबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ. 
विदर्भ

जिल्हाधिकारी, 'एसपीं'च्या नववधू-वरांना शुभेच्छा!

राजकुमार भीतकर

यवतमाळ - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यवतमाळ जिल्ह्यात आजपासून संचारबंदी सुरू झाली आहे. दरम्यान, मंगल कार्यालयातील गर्दीचा आढावा घेत असताना लग्न सोहळ्यात पोहोचलेल्या जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी नववधू-वराना शुभेच्छा तर दिल्याच, शिवाय त्यांना संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्याचे, मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले. 

संचारबंदी लागल्यापासून जिल्हाधिकारी सिंह स्वतः फिल्डवर आहेत. नागरिकांना गर्दी न करण्याचे, मास्क व सॅनिटायझर वापरण्याबाबत ते प्रत्यक्ष आवाहन करीत आहेत. पहिल्या कोरोना सत्रात सिंह यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. आताही ते प्रत्यक्ष फिल्डवर दिसताहेत. संचारबंदी लागू झाल्यामुळे शाळा, महाविद्यालयात व मंगल कार्यालयात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्यास मंगल कार्यालयावर कारवाई करण्याचे कडक निर्देश आहेत. आज, शनिवारी, रात्री जिल्हाधिकारी सिंह व पोलीस अधीक्षक डॉ. पाटील भुजबळ यांनी येथील आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनला भेट दिली. तेथे चि. प्रशांत व चि. सौ. का. रितेश्विनी यांचा मंगल परिणय सोहळा सुरू होता.

नातेवाईक, आप्तेष्ट शुभेच्छा देत होते. काही काळ थांबून स्वतः जिल्हाधिकारी सिंह व डॉ पाटील भुजबळ यांनी नववधू-वरास भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना कोरोनापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल सांगितले. मास्क व सॅनिटायझर -वापरण्याचे आवाहन केले. स्वतः जिल्ह्याचे दोन्ही उच्चपदस्थ अधिकारी लग्न सोहळ्यात आल्यामुळे आता काय कारवाई होते, या काळजीत पडलेल्या नवरी-नवरदेवांच्या डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षदा पडताच त्यांनी आभार मानत कृतज्ञ झाल्याची भावना व्यक्त केली. 

व्यवस्थापकाना केल्या सूचना
जिल्‍हाधिकारी एम. देवेंदर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांनी शनिवार रात्री येथील पल्लवी लॉनला भेट दिली. यावेळी त्यांनी व्यवस्थापकाना बोलावून त्यांना संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT