Congress protests against Modi government The issue of vaccines heated up 
विदर्भ

मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसची निदर्शने; लसींचा मुद्दा तापला

सुधीर भारती

अमरावती : केंद्रातील मोदी सरकारकडून कोरोनासारख्या महामारीतसुद्धा राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या लसींअभावी अनेक केंद्र बंद पडले आहेत, असा आरोप करीत शहर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी स्थानिक राजकमल चौकात मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केलीत. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी असून सुद्धा या राज्याला महाराष्ट्राइतक्‍याच लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रसोबत मोदी सरकार भेदभाव करीत आहे. महाराष्ट्राला लसींची गरज असताना सुद्धा केंद्र सरकार लसींचे राजकारण करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. मोदी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

आंदोलनात शहराध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, संजय वाघ, राजा बांगडे, सागर देशमुख, नीलेश गुहे, समीर जवंजाळ, देवयानी कुर्वे, अर्चना सवाई, नगरसेविका शोभा शिंदे, ऋग्वेद सरोदे, अब्दुल रफीक, ऍड. जिया खान, सुरेश रतावा, आकाश तायडे, मनीष पावडे, रज्ज ूबाबा, असलम सलाट, अनिल माधोगढिया,

अभिनय अभ्यंकर, सुरेश कनोजिया, बिलालखान, डॉ. जुबैर अहमद, गुड्डू हमीद, हाजी रफीक, शाहीन शाह, राजेश चव्हाण, राजेश ठाकूर, निसार अहमद मन्सूरी, शेख हुसैन बगदादी, प्रकाश पहूरकर, संजय बोबडे, मोहम्मद आरिफ मास्टर, शकील अहमद, भय्यासाहेब निचळ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते  सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT