चिटणीस पार्क : शहर कॉंग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे व कॉंग्रेस उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, गजराज हटेवार, जयंत लुटे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, विक्रम पनकुले, दिनेश बानाबाकोडे व इतर.
चिटणीस पार्क : शहर कॉंग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे व कॉंग्रेस उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, गजराज हटेवार, जयंत लुटे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, विक्रम पनकुले, दिनेश बानाबाकोडे व इतर. 
विदर्भ

कॉंग्रेस म्हणते बी पॉझेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये फक्त चैतन्यच आले नसून, अनेक सकारात्मक बदल घडू लागले आहेत. एरवी देवडियाची पायरी न चढणाऱ्या अनेक नेत्यांची कॉंग्रेस पक्ष कार्यालयात पायधूळ लागत आहे. यापुढे केवळ पॉझेटिव्ह चर्चाच करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 

शहर कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे यांच्यासह मध्यचे उमेदवार बंटी शेळके, दक्षिणचे गिरीश पांडव, पूर्वचे पुरुषोत्तम हजारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास ठाकरे यांनी आता आपल्याला महापालिकेची निवडणूक जिंकायची असल्याने फक्त सकारात्मक चर्चा करण्याची सूचना केली. ती सर्वांनी मान्यसुद्धा केली. यावेळी त्यांनी महापालिका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे निर्देश दिले. त्यासाठी जनतेच्या संपर्कात राहा आणि प्रत्येक बुथ कमिटी 15 कार्यकर्त्यांची करण्याची सूचनाही केली. 

बैठकीला अभिजित वंजारी, प्रशांत धवड, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, डॉ. गजराज हटेवार, दिनेश बानाबाकोडे, हरीश ग्वालवंशी, अतुल लोंढे, संजय महाकाळकर, जयंत लुटे, इर्शाद अली, प्रवीण आग्रे, संदेश सिंगलकर, बंडोपंत टेंभुर्णे, प्रवीण बेलगे, हरीश खंडाईत, आशीष दीक्षित, रवी घाडगे, मिलिंद दुपारे, विवेक निकोसे, पंकज निघोट, राजेश कुंभलकर, दिनेश तराळ, विक्रम पनकुले आदी उपस्थित होते. 

15 नोव्हेंबरनंतर महापालिकेवर धडक 
सहा नोव्हेंबरापासून महागाईच्या विरोधात आंदोलन करायचे आहे. 15 नोव्हेंबरनंतर जनतेच्या समस्या घेऊन महापालिकेवर धडक द्यायची आहे. हिवाळी अधिवेशनात जनसामान्यांच्या समस्या घेऊन विधानसभेवर मोर्चे काढायचे असल्याचा कार्यक्रमही यावेळी ठाकरे यांनी दिला. लवकरच सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याची सूचनाही ठाकरे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT