Congress tractor march in Amravati 
विदर्भ

काँग्रेसच्या ट्रॅक्टर मोर्चाने अमरावती दणाणली

राजू तंतरपाळे

अमरावती : केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या शेतकरी विधेयकांना काँग्रेसकडून सातत्याने विरोध केला जात आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. चार) शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ७० ते ८० ट्रॅक्टर शहराच्या रस्त्यांवर धडकल्याने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांमध्ये चांगलाच जोश संचारला होता.

स्थानिक राजकमल चौकातून दुपारी १२ वाजताच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेले तीन विधेयक हे शेतकरी व कामगार विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी केंद्र सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT