Congress
Congress 
विदर्भ

LokSabha 2019 : 'यांना उमेदवारी द्या.. नाहीतर काँग्रेस हारणारच!'

सकाळवृत्तसेवा

नागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा काँग्रेसचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी अत्यल्प कालावधी राहिलेला आहे.

रामटेकमधून भाजप-शिवसेना युतीचे कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. अशात काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी रामटेकमधून वासनिक यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. तसे निवेदनही राहुल गांधींना दिल्याची माहिती येथील प्रेस क्‍लबमध्ये शुक्रवारी देण्यात आली. 

निवडणूक जवळ आहे आणि वेळ कमी आहे. अशा परिस्थितीत इतर कुणाला उमेदवारी दिल्यास निवडणूक हरण्याचीच शक्‍यता जास्त आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव मुजीब पठाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

मुकुल वासनिक यांचा दीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि कार्यशैलीमुळे रामटेकमध्ये पक्षाचा विजय सोपा होईल. त्यामुळे त्यांनाच रामटेकमधून लढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

SCROLL FOR NEXT