विदर्भ

हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक

अनिल कांबळे

नागपूर : सुमारे पाच वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सुमारे बारा हजार हवालदारांसाठी खुशखबर आहे. पोलीस हवालदारांना पीएसआय म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 2013 मध्ये पोलिस उपनिरीक्षक अर्हता उत्तीर्ण झालेल्यांना पदोन्नती दिली जाणार आहे.
मंगळवारी सरकारने 1700 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक पोलिस निरीक्षक म्हणून बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षकांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर सुरुवातीला 2013च्या हवालादारांना सामावून घेतले जाणार आहे. उर्वरित पदोन्नत्या टप्प्याटप्याने केल्या जाणार आहेत.
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी निट बसविण्यासाठी गृहमंत्रालयाने गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या पीएसआय अधिकाऱ्यांची पदोन्नती निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जवळपास 1700 पोलिस उपनिरीक्षकांना एपीआय पदावर बढती मिळणार आहे. तसेच राज्यातील पीएसआय अधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेता राज्यात जवळपास 6 हजार पदे रिक्‍त आहेत. मात्र, आठवड्याभरात "पीएसआय टू एपीआय' पदोन्नतीमुळे 1700 जागा रिक्‍त होणार आहेत. या जागांवर 2013 मध्ये पोलिस महासंचालकांनी खात्याअंतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी 15 जुलैपर्यंत पदोन्नतीसंदर्भात ठोस पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आस्थापना विभागातील दप्तरदिरंगाईमुळे पीएसआय, एपीआय आणि पीआय अशा पदोन्नत्या रखडल्या होत्या. डीजींनी पुन्हा आस्थापना विभागाला धारेवर धरल्यामुळे आठवड्याभरात एपीआय पदावर प्रमोशन यादी निघणार आहे. तसेच आता रिक्‍त असलेल्या पीएसआय पदावरही प्रमोशन देण्यावर डीजी जयस्वाल यांचा भर आहे. त्यामुळे खात्याअंतर्गत पोलिस हवालदारांना दिवाळीपूर्वीच "प्रमोशन गिफ्ट' मिळण्याची शक्‍यता बळावली आहे.
"मास्टर लिस्ट' केंव्हा लावणार?
2013 अर्हता परीक्षेची अद्याप "मास्टर लिस्ट' लावण्यात आली नाही. त्यामुळे कुणाला प्रमोशन मिळेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही नापास हवालदारांना पीएसआय म्हणून प्रमोशन दिल्याचे "सकाळ'ने उघडकीस आणले होते. त्यानंतर त्यांना लगेच मूळ जागी पाठविले होते.


2013 मध्ये अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस हवालदारांना येत्या नोव्हेंबरपूर्वीच पीएसआय पदावर प्रमोशन देण्यात येईल. आस्थापना विभागाने तशी तयारी सुरू केली आहे. हवालदारांचे "मॅट'चे प्रकरण निस्तारल्यानंतर खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या हवालदारांच्या प्रमोशनचा मुद्दा निकाली काढण्यावर भर आहे.
- कुलवंत सारंगल, अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (आस्थापना)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

Latest Marathi News Live Update : बारामतीच्या पोटनिवडणुकीमधून काँग्रेसची माघार

MHADA: तरुणांसाठी आनंदाची बातमी! म्हाडामध्ये काम करण्याची संधी, भरघोस पगार मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT