file photo 
विदर्भ

सोलर कामासाठी नेमले विदर्भाबाहेरील कंत्राटदार; चंद्रपूर जिल्हा परिषदेचा प्रताप

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी सोलरपंप, सोलर लाइट, हायमॅक्‍स दिवे लावण्याची कामे निघतात. ही कामे देण्याबाबत एका पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त पॅनेलमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव येथील कंत्राटदारांचा समावेश आहे. कामे झाल्यावर हे कंत्राटदार जिल्ह्यात फिरकतही नसल्याने देखभाल, दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर पडून असल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी सोलरपंप, सोलर लाइट, हायमॅक्‍स दिवे लावण्यात येतात. ही कामे देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक पॅनेल नियुक्त केले आहे. त्यात चौदा कंत्राटदारांचा समावेश करण्यात आला आहे. या पॅनेलवर असलेल्या कंत्राटदारांनाच सोलर यंत्रणेशी निगडित कामे मिळतात. यातील बहुतांश कंत्राटदार हे मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद यासह अन्य ठिकाणचे आहेत.

जिल्ह्यातील केवळ दोन कंत्राटदार

चंद्रपूर जिल्ह्यातील केवळ दोनच कंत्राटदार या पॅनेलवर आहेत. या पॅनेलवर विदर्भाबाहेरील असलेल्या कंत्राटदार अनेकदा पेटी कॉन्ट्रॅक्‍ट देऊन मोकळे होतात. जिल्ह्यात येऊन कामे करणे शक्‍य नसल्याने ते दुसऱ्याच कंत्राटदारांना कामे देतात. दुसरी यंत्रणा कामे करून मोकळे होते. मात्र, जेव्हा देखभाल, दुरुस्तीची वेळ येते; तेव्हा ती कामे करीत नाही. परिणामी सोलरपंप, सोलर लाइट, हायमॅक्‍स दिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर पडून आहेत.

निधी वाया गेल्याच्या प्रतिक्रिया

यंत्रणा दुरुस्त करण्याबाबत लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांकडे नागरिक तक्रारी करीत आहेत. मात्र, ही कामे मिळतात एकाला आणि करतात दुसरेच. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर देखभाल, दुरुस्तीची कामे पडून आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभाग, यांत्रिकी विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या कामावर करण्यात आलेल्या निधी वाया गेल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.


पूर्व विदर्भातील कंत्राटदारांना द्यावी कामे
दोनशे किलोमीटर परिघातील कंत्राटदारांची या पॅनेलवर नियुक्ती करणे आवश्‍यक आहे. त्यातही पूर्व विदर्भातील कंत्राटदारांना सोलरशी संबंधित कामे देण्याबाबत जिल्हा परिषदेने निर्णय घ्यावा. असे केल्यास सोलर यंत्रणेशी संबंधित कामे योग्य पद्धतीने होईल. स्थायी समितीच्या सभेत हा प्रश्‍न आपण उपस्थित करू.
- संजय गजपुरे, जिल्हा परिषद सदस्य.


(संपादन : दुलिराम रहागंडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT