Corona : Death of an old women in Amravati, one in critical condition 
विदर्भ

कोरोना ब्रेकिंग : अमरावतीत वृद्धेचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : स्थानिक हबीबनगर येथील 74 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाला. यासोबतच कोरोनाने मृतांची संख्या 19 झाली आहे. तर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. 

हबीबनगर येथील संबंधित 74 वर्षीय महिलेस कोरोनासदृश लक्षणे असल्याने तिने जिल्हा कोविड रुग्णालयात घशातील लाळेचा नमुना तपासणीसाठी दिला होता. त्यानंतर संबंधित महिला घरी परत आली. रविवारी तिचा घरीच मृत्यू झाला. त्यापाठोपाठ सोमवारी तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिलेच्या मृत्यूची पुष्टी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी केली. 

यासोबतच कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याचे वडीलसुद्धा कोरोनाबाधित आहेत, तर बहीण आरोग्यसेवेत आहे. संबंधित व्यक्ती आणखी एका वेगळ्या आजाराने ग्रस्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा कोविड रुग्णालय नागपूर येथे तर स्थानिक खासगी रुग्णालयात, पीडीएमसीमध्ये रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 
 

खासगी डॉक्‍टरांसाठी सूचना

 सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. डॉक्‍टर लक्षणानुसार कोरोना चाचणीचा सल्ला देतात, काही जण सल्ला ऐकतात तर काही रुग्ण धुडकावून लावतात. त्यामुळे त्या कुटुंबातील व्यक्तींना बाधा होते. यासाठी खासगी डॉक्‍टरांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

मृत्यू संख्या चारने वाढणार

 जिल्ह्यातील तीन ते चार व्यक्ती नागपूरला आतापर्यंत परस्पर दाखल झाले. तेथेच त्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ती संख्या धरून जिल्ह्यातील मृतांचा आकडा 23 च्या घरात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर! Uber अ‍ॅपवरून थेट तिकीट बुकिंग होणार; 50% सूटही मिळणार, पण कुठे?

Navi Mumbai: नवी मुंबईचे पाणी दर वाढणार? नवा दर लागू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव

Jalgaon News : जळगावात ७५ कोटींचा 'केळी' घोटाळा! लागवड नसतानाही लाटला विमा; ४२ सीएससी चालकांवर गुन्हे

SCROLL FOR NEXT