विदर्भ

यवतमाळमधील पुसदमध्ये कोविड रुग्णाची दुपट्ट्याने गळा आवळून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care center) दाखल असलेल्या कोविड रुग्णाने खिडकीच्या गजाला गळ्यातील दुपट्टा बांधला व त्या दुपट्ट्याने गळा आवळून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. तीन) मध्यरात्री उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. (corona patient end his life in Pusad yavatmal)

मृत व्यक्तीचे नाव बळीराम मोतीराम राठोड (वय ५५) असून, तो महागाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी होता. कोरोनाबाधित झाल्याने त्याला गेल्या २८ मे रोजी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, खासगी रुग्णालयाचा खर्च जास्त असल्याने त्याला ३० मे रोजी पुसदच्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डात उपचार सुरू होते. मुख्य म्हणजे कोविडवर मात करण्यात या रुग्णाने यशही मिळविले होते. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता व त्याला एक-दोन दिवसांत रुग्णालयातून सुटीही देण्यात येणार होती. मात्र, गुरुवारी (ता.३) मध्यरात्री बळीराम राठोड यांनी प्रसाधनगृहातील खिडकीच्या लोखंडी गजाला स्वतःच्या गळ्यातील दुपट्टयाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

ही घटना रात्री डॉक्टर राऊंडवर असताना उघडकीस आली. त्यावरून तत्काळ पुसद शहर पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी (ता. ४) सकाळी शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मस्के व मेहत्रे, जमादार राजेश ससाणे, राठोड आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

(corona patient end his life in Pusad yavatmal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT