Corona Re-infiltration in Yavatmal district, four death in three days 
विदर्भ

कोरोना ब्रेकिंग : यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा शिरकाव, तीन दिवसांत चौघांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत असलेल्या 58 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनामुळे बुधवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या आठ झाली. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक शांत झाला होता. कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून, गेल्या तीन दिवसांत चार मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

धक्‍कादायक म्हणजे या रुग्णांनी खाजगी डॉक्‍टरांकडे उपचार घेतले. उपचारादरम्यान डॉक्‍टरांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात रेफर केले, परंतु तोपर्यंत खपू उशीर झाला असल्याचे सांगितले जाते. बुधवारी दगावलेला व्यक्ती मूळचा अकोला येथील असून, 14 जून रोजी तो येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला खोकला आणि ताप होता. 15 जून रोजी त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले. मात्र, बुधवार, 17 जूनच्या पहाटे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले. 

गत तीन महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता. शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतानाच आता पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री झाली. नेताजी चौक येथील 45 वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सदर व्यक्‍तीला दोन-तीन दिवसांपासून ताप आणि खोकला आहे. तसेच त्याने सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. या व्यक्तीच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले. 

हा व्यक्ती राहत असलेला शहरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नागरिकांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या संपर्कात येऊ नये. अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीकरिता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे. अनावश्‍यकपणे नागरिकांनी बाहेर फिरू नये. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT