corona report of both was negative In Chandrapur district 
विदर्भ

विदर्भातील या जिल्ह्यासाठी आली आनंदाची बातमी; दोघांचे अहवाल निगेटिव्ह, एकाची...

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूरकरांसाठी सकाळी सकाळी एक दिलासादायक बातमी आली आहे. दोन मे रोजी जो रुग्ण पोझिटिव्ह आढळला होता, त्याच्या पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर मुलाचा रिपोर्ट अजून यायचा आहे. सवा महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पोझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन केले होते. आता त्यातील दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

देशात कोरोना विषाणूने चांगलाच थैमान घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. एकट्या विदर्भाचा विचार केला तर नागपूर आघाडीवर असल्याचे दिसून येते. येथेच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर यवतमाळ आणि अमरावतीचा नंबर लागलो. उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव व्हायचा होता. मात्र, भंडारा पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने आणखी एका जिल्ह्याचा कोरोनाच्या यादीत समावेश झाला होता.

शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता चंद्रपूर जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आढळून आला होता. यामुळे चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णानगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा "ऑरेंज झोन'मध्ये समावेश करण्यात आला होता. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील दोघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने थोडी चिंता कमी झाली आहे. मात्र, एकाचा मुलाचा अहवाल अद्याप यायचा आहे. 

विदर्भातील तीन जिल्हे "रेड झोन'मध्ये

नागपूरचा "रेड झोन'मध्ये समावेश राहील याची पूर्वीपासूनच कल्पना होती. कारण, येथे सर्वाधिक रुगण आढळून येत आहेत. मात्र, यवतमाळ आणि अमरावती यांचा यात समावेश होईल असे वाटत नव्हते. कारण, येथे थोड्याअधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, यवतमाळात 80 आणि अमरावतीत 53 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या दोन्ही जिल्ह्याचा "रेड झोन'मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT