'Corona' test to be held in Akola! 
विदर्भ

अकोल्यातच होणार ‘कोरोना’ची तपासणी!

शुभम बायस्कार

अकोला : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसरी लॅब येत्या 15 ते 20 दिवसात सुरू होणार आहे. ‘कोरोना’ विषाणूशी दोन हात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग भक्कम यंत्रणा उभारत आहेत. इतरही विभाग यामध्ये समन्वयाची महत्त्वाची भूमिका घेत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि तातडीने निदान व्हावे यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 18 मार्च रोजी राज्यातील आठ ठिकाणी कोरोना तपासणी लॅब सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यापार्श्वभूमीवर नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर विदर्भातील दुसरी कोरोना तपासणी लॅब (‘व्हायरल रिसर्च डाग्नोस्टीक लॅब’) अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. इन्फ्रास्ट्र्चर हापकीनकडून लवकरच मेडिकलला उपलब्ध करुन दिले जाणार शिवाय बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचीही मदत घेतली जात असल्याची माहिती मेडिकलकडून देण्यात आली आहे. 

एनआयव्हीकडून प्रशिक्षण सुरू 
कोरोनाच्या तपासणीचे अचूक निदान व्हावे यासाठी मेडिलक कॉलेजच्या मायक्रोबॉयलॉजी विभागाच्या तज्ज्ञांच्या चमूला पुण्याला नुकतेच रवाना करण्यात आले आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून, त्यानंतर अकोल्यात ते सेवा देणार आहेत. तत्पूर्वी एनआयव्हीच्या प्रशासकीय मान्यतेचाही मेडिकलला आवश्‍यकता असणार असल्याचे मेडिकल कॉलेजकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT