corona grab akola.JPG 
विदर्भ

कोरोना व्हायरस : जाणून घ्या काय आहे संपूर्ण लॉकडाउन...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महापालिका हद्दीत रविवारच्या (ता. 3) मध्यरात्रीपासून ते मंगळवारच्या  (ता. 5) मध्यरात्रीपर्यंत दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन लागू केला आहे. या संपूर्ण लॉकडाउनमधून वैद्यकीय सेवांना वगळण्यात आले आहे. दोन दिवसांच्या लॉकडाउननंतर मनपा हद्दीत सम तारखांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे तर विषम तारखांना संपूर्ण लॉकडाउन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 17 मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी अकोला मनपा हद्दीत वैद्यकीय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवांसह बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे 3 ते 5 मे दरम्यान महापालिका हद्दीत लॉकडाउन लागू राहिल. या काळात दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अनुमती देण्यात आली आहे. तसेच दैनिक वृत्तपत्रांचे वितरण सुरु राहिल. 

‘सम’ तारखांना मर्यादित; ‘विषम’ला पूर्ण लॉकडाउन
सम तारखांना म्हणजेच 6, 8, 10, 12, 14 व 16 मे रोजी पूर्वीच्या आदेशाप्रमाणे संचारबंदी कायम राहिल, तर विषम तारखांना म्हणजेच 7, 9, 11, 13, 15 व 17  तारखेला रविवारी (ता. 3) दिलेल्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय सेवा वगळता मनपा हद्दीत संपूर्ण लॉकडाउन पाळण्यात येईल. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

विषम तारखांना हे राहिल बंद
विषम तारखांना मनपा हद्दीतील सर्व बॅंका, एलआयसी सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरीक्त कोणत्याही व्यक्तीला मुक्तसंचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुमतीने सुरु असलेले मनपा हद्दीतील पेट्रोल व डिजेल पंप वगळून अन्य सर्व पंप बंद राहतील. नगरपरिषद व ग्रामीण भागातील पेट्रोल, डिजेल पंप सुरु राहतील. एमआयडीसी येथील परवानगी दिलेले उद्योग सुरु राहतील. नगरपरिषद व ग्रामीण भागाकरीता पूर्वीचेच आदेश लागू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT