corona worriers protesters angry on wadettiwar statement in chandrapur 
विदर्भ

'वडेट्टीवार माफी मागा...', पालकमंत्र्यांची कोरोना योद्ध्यांना झोडपण्याची भाषा

प्रमोद काकडे

चंद्रपूर : जीव मुठीत घेऊन कोरोनाच्या काळात सेवा दिली. आठ महिन्यांपासून वेतन नाही. हातातोंडाशी गाठ पडणे अवघड आहे. घरदार सोडून वादळ वारा झेलत डेरा टाकून आहोत. मागणी काय, तर आमच्या हक्काचे वेतन द्या.  दोन महिन्यांत तुम्ही अनेकदा आमच्या समोरून गेले. साधी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही. आता तुम्ही आम्हालाच झोडपण्याची भाषा करता. तुम्ही मदत व पुनर्वसन मंत्री आहात. जिल्ह्याचे तुम्ही पालक आहात. पालकमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही. कोरोना योद्धांचा हा अपमान आहे. वडेट्टीवार माफी मागा... असे म्हणत शेकडो आंदोलक महिलांनी संताप व्यक्त केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी पालकमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी 'डेरा' आंदोलनावर बोलताना वडेट्टीवारांचा तोल सुटला. आंदोलनातील कामगार उठले नाहीतर त्यांना झोडपून काढू, असे आदेश प्रशासनाचा दिल्याचे वक्तव्य वडेट्टीवारांनी केले. त्यांच्या या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. दरम्यान, वडेट्टीवारांच्या वक्तव्याची ऑडिओ क्‍लीप  समाजमाध्यमावर पसरली. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जनविकास संघटनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आंदोलनस्थळी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी मोठ्या संख्येत आंदोलक महिला उपस्थित होत्या. त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. थकीत वेतनासाठी कोरोना योद्ध्‌यांना दोन महिन्यांपासून रस्त्यावर झोपावे लागत आहे. त्यांना हक्काचे वेतन द्यायचे नाही. उलट त्यांना झोडपून काढण्याची भाषा पालकमंत्री करीत आहे. महाविकास आघाडी सरकारचे कोरोना योद्धा, कामगार आणि महिलांबाबतचे हेच धोरण आहे काय? आंदोलनातील मागण्या चुकीच्या आहे. हे सिद्ध करून दाखवावे, असे आवाहन पालकमंत्र्यांना आंदोलकांनी यावेळी दिले. 

पालकमंत्र्यांना नैराश्‍य -
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजपर्यंत डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले, असे ते सांगतात.  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्री. यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय या सर्वांसोबत त्यांनी वारंवार बैठका घेतल्या.  नियमानुसार तोडगा सुचवला तरीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नैराश्‍यातून पालकमंत्र्यांनी आपला राग आंदोलनकर्त्यांवर काढला असावा, असा टोला जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत लावला.

आंदोलकांकडे पाठ -
मागील दोन महिन्यांपासून थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या गोरगरीब महिला-पुरुष कामगारांची भेट घेण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. याकाळात ते अनेकदा चंद्रपुरात येऊन गेले. आंदोलकांना ओलांडून त्यांनी अनेक बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्या. मात्र, थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या आंदोलकांकडे त्यांनी ढुंकूनही बघितले नाही. आता त्याच आंदोलकांना झोडपण्याची भाषा ते करीत आहेत. हा कोरोना योद्धयांचा अपमान आहे. पालकमंत्र्यांना आंदोलकांची माफी मागावी, असा संतप्त सूर आंदोलकांमध्ये होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT